दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनस्थळी एका ३५ वर्षीय व्यक्तीचे हात-पाय तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. यानंतर आता ही हत्या नेमकी कोणी केली आणि का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अद्याप कारणाचा आणि गुन्हेगाराचा तपास लागला नसल्याचं म्हटलंय. मात्र, संयुक्त किसान मोर्चे नेते बलबीर सिंग यांनी या हत्येबाबात गंभीर आरोप केलाय. या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधण्यामागे निहंगा शिख समुहातील लोक असल्याचा आरोप बलबीर सिंग यांनी केलाय. तसेच निहंगा सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाला अडचणीत आणत आहेत, असंही सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, “या हत्येमागे निहंगा आहेत. त्यांनी हे मान्य केलंय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत.” संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचं म्हटलंय. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे.

“आंदोलनस्थळी हात-पाय तोडलेला बॅरिकेट्सला लटकवलेला मृतदेह सापडला”

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, “सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला.”

अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

“याला कोण जबाबदार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती हंसराज यांनी दिली.

हेही वाचा : Farmers Protest : “एक हात तोडून मृतदेह बॅरिकेड्सला बांधला”, सिंधू बॉर्डरवरील हत्याकांडाने देशभरात खळबळ

हत्येचं कारण काय?

या हत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलिसांनी देखील याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, हत्येच्या कारणांबाबत अनेक चर्चा आहेत. त्यापैकी एक चर्चा निहंगा शिख समुहातील काही लोकांनी ही हत्या केल्याची आहे. पीडित व्यक्तीने शिख धर्माचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’चा अपमान केल्यानं ही हत्या झाल्याचं बोललं जातंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader allegations about who is murderer in singhu border killing case pbs
First published on: 15-10-2021 at 13:33 IST