Israel-Iran conflict : अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर भारतातील अनेक राजकीय पक्षांमधील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल्ला म्हणाले की, “मला दुखः या गोष्टीचं आहे की जे मुस्लिम राष्ट्र तेथे आहेत, ते देखील शांत बसून तमाशा पाहात आहेत. आज याची (इराण) ही परिस्थिती आहे, उद्या दुसर्‍यांचे देखील असेच हाल होतील, मी तुम्हाला सांगून ठेवतो आणि अमेरिका त्यांना देखील संपवण्याचा प्रयत्न करेल जे आज गप्प आहेत.”

फारूख अब्दुल्ला म्हणाले की, “मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची वेळ देखील नक्की येईल, आज जागे झाले नाहीत तर अल्लाह… त्यांनी वाट पाहावी त्यांची वेळही येणार आहे.”

या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारला असता फारूख अब्दुल्ला म्हणाले की तेल सर्वाधिक प्रमाणात तेथूनच येथे जेव्हा ते बंद होईल तेव्हा याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.

ट्रम्प यांना नेमकं काय साध्य करायचे आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलताना अब्दु्ल्ला म्हणाले की, “नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी आर्मी चीफ यांना जेवणासाठी बोलावले होते…. मला कल्पना नाही की डोनाल्ड ट्रम्प कोणता खेळ खेळत आङेत, एकीकडे भाराताला देखील हाताशी ठेवले आहे, दुसरीकडे पाकिस्तानलाही हातात ठेवले आहे…. ट्रम्प काय करत आहेत काय माहिती?”

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यात वाद सुरू होता तेव्हा अमेरिका का युद्धात सहभागी झाला? त्यांनी प्रश्न उपस्थित केला की यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना उडी घेण्याची काय गरज होती?

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फाहान अणु अस्थापनांवर हल्ला केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले आहेत, यामूळे संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत. इराणने केलेल्या ताज्या हल्ल्यात मध्य आणि उत्तरेकडील भागांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की जियोना, रिशोन लेजियन आणि हाइफा या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.