Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी एक अनोखा प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. अलीगढ येथील एक महिला आपल्याच मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर घरातून पळून गेली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती त्याच्या होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला आणि मुलाऐवजी त्यानेच तिच्याबरोबर लग्न केलं. या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या रामपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एक व्यक्ती स्वत:च्या मुलाचं लग्न जमावण्यासाठी गेला. मात्र, तेथे गेल्यानंतर होणाऱ्या सुनेच्याच प्रेमात पडला. झालं असं की एका वर्षापूर्वी त्याच्या मुलाचं लग्न एका मुलीशी ठरवलं होतं. आता मुलाचं लग्न ठरवल्यामुळे मुलाचे वडील त्या मुलीच्या घरी येऊ लागले. मात्र, याच दरम्यान या व्यक्तीचं आपल्या होणाऱ्या सुनेवरच प्रेम जडलं. मात्र, याचं बाबत कोणालाही थोडीही शंका आली नाही.
त्यानंतर मुलाचं लग्न काही दिवसांवर आल्यानंतर वडिलाने होणाऱ्या सुनेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो म्हणून सांगितलं आणि बरोबर घेऊन नेलं. मात्र, त्यानंतर मुलगी आणि सासरा हे घरी आलेच नाहीत त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना शंका आली, तेव्हा चौकशी केली असता आपली मुलगी आणि तिचा होणारा सासरा हे दोघे पळू गेल्याचं समजलं आणि त्यांना धक्का बसला. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, त्यानंतर मुलगी आणि तिचा होणारा सासरा यांनी पळून जाऊन लग्न केलं. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. सध्या या अजब घटनेची सोशल मीडियात देखील मोठी चर्चा रंगली आहे. तसेच आपल्याला समाजाची पर्वा नसल्याचं सांगत जन्मभर हिती साथ सोडणार नसल्याचं आता त्याने सांगितलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर मुलाच्या कुटुंबात आणि त्या मुलीच्या नातेवाईकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात काहीसा तणाव देखील निर्माण झाला आहे.