येथील एका आयलंड रिसॉर्टच्या नजीक माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक असलेल्या ४० वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणात सामील असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
येथून ३० कि.मी अंतरावर असलेल्या पोझियार स्टार प्रवर्गातील रिसॉर्टमध्ये ही महिला कार्यालयीन सहलीसाठी सहकाऱ्यांसमवेत आली असताना ही घटना २८ नोव्हेंबरला पहाटे घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती पहाटे २.३० वाजता खोलीत आली तेव्हा दोघांनी आपल्यावर बलात्कार केला. या महिलेला या झटापटीत इजा झाली. ती घाबरलेल्या अवस्थेत असून तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्य़ाची नोंद केली असून ही महिला बंगलोरला निघून गेली. तिच्या खोलीतून फोरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून फोन कॉल्सची मााहिती घेतली आहे. गुन्ह्य़ाच्या वेळी तिथे कोण व्यक्ती होत्या याची माहिती घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे असे तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 हा रिसॉर्ट टेहळणीखाली असून कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेण्यात आले. माकप नेते व्ही.एस अच्युतानंदन यांनी राज्य सरकारला या घटनेची चौकशी करण्यास सांगितले आहे. रिसॉर्टच्या मालकालाही चौकशीच्या कक्षेत आणावे व तारांकित रिसॉर्टमध्ये महिलांना असुरक्षितता वाटेल असे वातावरण ठेवल्याच्या आरोपावरून चौकशी करावी अशी मागणी माकपने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female it professional raped in posh kerala resort
First published on: 02-12-2013 at 01:30 IST