रोम : एका वादग्रस्त सरकारी प्रस्तावावरून इटलीच्या कनिष्ठ सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि त्यातून हाणामारी झाली. यामुळे एका विरोधी पार्लमेंट सदस्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.बुधवारी झालेल्या वादाची चित्रफीत प्रसारित झाली असून त्यात अनेक पार्लमेंट सदस्य ५-स्टार चळवळीचे पार्लमेंट सदस्य लिओनार्डो डोनोवर हल्ला करताना दिसत आहे.

हेही वाचा >>> कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सैन्यदले सज्ज; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिओनार्डो डोनो यांनी वादग्रस्त सरकारी प्रस्तावाचा निषेध केला आणि इटालियन ध्वज प्रादेशिक व्यवहार मंत्री रॉबर्टो कॅल्डरोली यांना देण्याचा प्रयत्न केल्यावर गोंधळ उडाला. इटलीच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डोनो यांना डोक्याला आणि छातीला दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेचा निषेध केला आहे. हिंसाचाराचा अवलंब करण्याची गरज नाही समस्येचे निराकरण करा, असे ते म्हणाले. वादग्रस्त प्रस्तावावर विरोधकांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे इटलीमधील उत्तर-दक्षिण विभाजन वाढेल.