Reaction On New Income Tax Slab : भारतातील उत्पन्न असमानतेबद्दल एका फिनटेक तंत्रज्ञांची पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, दरवर्षी ६० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब मानले पाहिजे. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने आणलेल्या नवीन आयकर स्लॅबवरील पोस्टला उत्तर देताना तंत्रज्ञाने हा दावा केला आहे. दरम्यान तंत्रज्ञाच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर अनेकजण बऱ्या वाईट प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.


२४ लाख पगार घेऊन तुम्ही गरीब असल्यासारखे वागताय?

“फक्त आयटी क्षेत्रातील लोकच आज १२ लाखांपर्यंतच्या कर सवलतीबद्दल ओरडत आहेत. आयटी क्षेत्रात नसलेल्या अनेकांसाठी, ७-१० वर्षांच्या अनुभवानंतरही १२ लाख पगार हा स्वप्नवत पगार आहे. २४ लाखांहून अधिक कमावणाऱ्या आयटी क्षेत्रातील या लोकांनी स्वतःला निम्न मध्यमवर्गीय म्हणवून घेणे थांबवायला पाहिजे. १२ लाखांहून अधिक पगार मिळवणाऱ्यांनी तर हे विसरूनत जावे. भारतात सरासरी पगार किती आहे हे तपासा आणि तुमचा काय दर्जा आहे ते पहा. २४ लाख पगार घेऊन तुम्ही गरीब असल्यासारखे वागताय? कृपया हा प्रकार थांबवा,” असे पहिल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याला उत्तर देताना तंत्रज्ञाने दरवर्षी ६० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब मानले पाहिजे असे म्हटले आहे.

‘तर तुम्ही श्रीमंत नाही…’

फिनटेक तंत्रज्ञाने पहिल्या पोस्टला प्रत्युत्तर देत दावा केला की, ७०% उत्पन्न जीएसटी आणि व्हॅट सारखे कर म्हणून दिले जाते असेल तर दरमहा २ लाख रुपये कमावणारा मध्यमवर्गीय आहे.

तंत्रज्ञाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एखाद्या कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न ६० लाख रुपयांपेक्षा कमी आहे म्हणजे तो गरीब आहे. तुम्ही जीएसटी, आयकर आणि व्हॅटच्या स्वरूपात ७०% उत्पन्न कर म्हणून भरता. वर्षाला ६० लाख ते कोटी रुपये कमवणारे लोक मध्यमवर्गीय असतात. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लोक उच्च मध्यमवर्गीय असतात. जर तुमच्याकडे पिढीजात संपत्ती नसेल तर तुम्ही श्रीमंत नाही,” असे तो म्हणाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्ही वर्षाला ६० लाख रुपये कमावत असाल, तर मेट्रो शहरात, जोडीदार आणि दोन मुलांसाठी फ्लॅट घेण्यासाठी किमान ५-६ वर्षे लागतील,” असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.