मध्य प्रदेशातील भोपाळची जागा सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून दिग्वीजय सिंह निवडणूक लढवत आहेत तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आज दिग्वीजय सिंह यांच्या रोड शोमध्ये भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. रॅलीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅलीत दिग्विजय सिंह यांच्यासोबत काॅम्युटर बाबा देखील उपस्थित होते.
Madhya Pradesh: FIR registered after a group of people raised Modi slogans in Congress candidate Digvijaya Singh's roadshow in Bhopal.
— ANI (@ANI) May 8, 2019
दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याने येथे साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे तैनात करण्यात आलेल्या सर्व पोलिसांनी भगवे पंचे परिधान केले होते. याबाबत त्यांना विचारले असता रोड शो दरम्यान त्यांना असे भगवे पंचे घालण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रोड शोचे नेतृत्व कॉम्प्युटर बाबांनी केले होते. यामध्ये अनेक साधू देखील सहभागी झाले होते.
साध्वी प्रज्ञासिंह यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट साधू-संतांनाच निवडणूक प्रचारात उतरवले आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांना कॉम्प्युटर बाबांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. मंगळवारी इथल्या एका मैदानावर या साधूंनी दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी हटयोग केला होता.
कॉम्प्युटर बाबा यापूर्वी भाजपासोबत होते मात्र, काही कारणांनी नाराज झाल्यानंतर त्यांनी भाजपाची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात धरला. भोपाळमध्ये १२ मे रोजी पाच टप्प्यातील मतदान होणार आहे.