CBI Headquarter : दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात लागली आग

नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली.

Fire at CBI Headquarters Delhi
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली (photo indian express)

नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. पार्किंग एरियाच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या मदचीने आग आटोक्यात आणली गेली आहे. परंतु, ही आग कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज लावल्या जात आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.

हेही वाचा- दिल्लीत नायट्रोजन डायॉक्साईड प्रदूषणात १२५ टक्क्यांनी वाढ

अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.३५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि वातानुकूलन प्लांटच्या खोल्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती त्यांनी दिली.

सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “शॉर्ट सर्किटमुळे सीबीआय इमारतीत जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. आगीने मालमत्तेचे नुकसान झाले नाही. धूरानंतर स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा सक्रिय झाली होती.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire at cbi headquarters delhi short circuit reason officers run outside the building srk

ताज्या बातम्या