Iran Oil Refinery Fire Video : इराणच्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या तेल शुद्धिकरण कराखान्यात रविवारी मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. इराणच्या सरकारी वृ्त्तवाहिन्यांनी यासंबंधी वृत्त दिले आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी अबदान ऑइल फॅसिलिटी येथे दुरूस्तीचे काम सुरू असलेल्या युनिटमधील पंप गळतीमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान या आगीच्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इराणच्या संसदेचे डेप्युटी स्पीकर अली निकझाद यांनी रविवारी दिल्याचे वृत्त वृत्तसंस्था एपीने दिले आहे. दरम्यान या आगीच्या घटनेनंतर आपत्कालीन पथकांनी तत्काळ मदत पुरवली आणि दोन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान या दुर्घटनेची तीव्रता किती आहे याबद्दल स्पष्टता मिळू शकलेली नाही.

अबदान ही रिफायनरी तेहरानपासून दक्षिण-पश्चिमेकडे ६७० किमी अंतरावर आहे, आणि ही देशातील सर्वात मोटी रिफायनरी आहे. या रिफायनरीचे काम हे १९१२ मध्ये सुरू झाले होते आणि इरामधील एकूण इंधन उत्पादनाच्या अंदाजे २५ टक्के वाटा या रिफायनरीचा आहे आणि याची दररोजची रिफायनिंगची क्षमता ही ५.२ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे.

गेल्या काही दिवसांत इराणमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. यादरम्यान अबदान येथील घटनेचीही भर पडली आहे. यामुळे अनेक निवासी आणि व्यावसायिक मलमत्तांना फटका बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान प्रशासनाने या घटना गॅस लिक आणि इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या रिफायनरीला लागलेल्या आगीची चौकशी झाल्यानंतरच याचे खरे कारण समोर येणार आहे.