सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात रविवारी दुपारच्या सुमारास किरकोळ आग लागली. आगीचे वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग आटोक्यात आणली गेली.
आर.के.जैन वकिलांच्या कक्षात ही आग लागली व ती लगेच आटोक्यात आणली गेली. त्यात कुठलीही हानी झाली नाही असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारी १२.५० वाजता अग्निशमन दलास आग लागल्याचा दूरध्वनी गेला तेव्हा आठ अग्निशमन बंब तेथे आले व त्यांनी आग आटोक्यात आणली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण समजू शकले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2014 रोजी प्रकाशित
सर्वोच्च न्यायालयात किरकोळ आग
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात रविवारी दुपारच्या सुमारास किरकोळ आग लागली. आगीचे वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग आटोक्यात आणली गेली.
First published on: 28-04-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire breaks out in lawyers chamber block in supreme court