येथील सर्वात मोठय़ा फटाके बाजाराला रविवारी लागलेल्या भीषण आगीत किमान एकाचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला़ कलाभवन मैदानात फटाक्यांची सुमारे ५० दुकाने असलेला मोठा बाजार आह़े तेथे खरेदीसाठी येणाऱ्यांच्या गाडय़ाही जवळ उभ्या केल्या जातात़ तेथूनच आगीचा भडका उडाला़ यात ठार झालेल्या एकाचा मृतदेह ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आल्याचे वडोदरा महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी एस़ ज़े तपारिया यांनी सांगितल़े मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही़ २७ अग्निशामक यंत्र आणि १५० कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत़ दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आल़े ही आग सर्किटमुळे लागव्या अंदाजही तपारिया यांनी वर्तविला आह़े