या महिन्याच्या सुरुवातीला भारतभेटीसाठी आलेल्या एका सीआयए अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम झाल्याची माहिती समोर आली आहे. हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या शिष्टमंडळाचा भाग होते. त्यांना भारतात मुक्कामी असताना वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असे सीएनएन आणि एनवायटीवरील अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या व्हिएतनाम भेटीला उशीर झाल्यानंतर काही आठवड्यांनी ही बाब समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकन कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या प्रवासापूर्वी   हवाना सिंड्रोमची लक्षणे असल्याचं सांगितलं होतं. या सिंड्रोमचा पहिला रुग्ण २०१६मध्ये क्युबामधील हवानामध्ये आढळला होता. त्यामुळे त्याला हवाना सिंड्रोम नाव देण्यात आलंय. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हवाना या रहस्यमय न्यूरोलॉजिकल आजाराने रशिया, चीन, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांमधील अमेरिकन गुप्तहेर आणि मुत्सद्यांना ग्रासले आहे.

काय आहे हवाना सिंड्रोम आणि त्याची लक्षणे?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ८ सप्टेंबरला अमेरिकेचे गुप्तहेर सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांची दिल्लीत भेट घेतली होती. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांची नावे जाहीर केल्यानंतर या दोघांमध्ये बैठक झाली होती. ज्या अमेरिकन अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोमची लागण झाली आहे, ते अधिकारी देखील या बैठकीचा भाग होते आणि भारतात असताना त्यांना लक्षणे जाणवली अशी माहिती मिळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First case of havana syndrome reported in india hrc
First published on: 21-09-2021 at 15:15 IST