पणजी : पणजी येथील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी पहिले प्रवासी विमान उतरले. याबरोबरच गोव्यातील या नव्या विमानतळाचे औपचारिक कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद येथून १७९ प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगोचे विमान उत्तर गोव्यातील मोपा येथील नव्या विमानतळावर सकाळी नऊ वाजता पोहोचले. केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री सावंत आणि गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खौंटे यांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत प्रवाशांचे स्वागत केले. गोव्यात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ‘‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे. आता गोव्यात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी २ हजार ८७० कोटी रुपये खर्च झाला आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे ४४ लाख जण प्रवास करू शकतात.

More Stories onगोलGoal
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First flight land at manohar international airport in goa zws
First published on: 06-01-2023 at 05:51 IST