जगभरात असे अनेक दुर्मिळ जीव आहेत ज्यांच्याबाबत आपल्याला माहितीही नसते. ओदिशाच्या समुद्र किनाऱ्यावरही असाच एक अनोखा मासा पकडण्यात आला आहे. एखाद्या पक्षाप्रमाणे चेहरा असलेला हा ‘मयूरी मासा’ नावाने ओळखला जातो. अत्यंत दुर्मिळ असलेल्या या माशाची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या घरात किंमत आहे. मोराप्रमाणे चेहरा असल्याने या माशाला स्थानिक नागरिक मयूरी मासा म्हणतात असं सांगितलं जातं.

आणखी वाचा- गंमतीत ५० अंडी खाण्याची पैज महागात, ४२ वं अंडं खाताच…

ओडिशाच्या राजनगर येथील तालचुआ परिसरातून हा अनोखा मासा पकडण्यात आला. शुक्रवारी सकाळी केंद्रपारा जिल्ह्यातील एका मच्छिमार मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेला असता त्याच्या जाळ्यात हा मासा अडकला. या माशामुळे त्या मच्छिमाराचं नशीब फळफळलं असून 20 किलोग्राम वजनाच्या या माशाची जवळपास 2 लाख रुपयांना विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दुर्लभ प्रजातीच्या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ताशी 135 किमी इतका या माशाचा कमाल वेग असल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ओडिशाच्या चंदवाली भागात ड्रोन सागर नावाचा एक अनोखा मासा आढळला होता. तब्बल १०७ किलो वजनाचा हा मासा एका औषध कंपनीने ७ लाख ४९ हजार रुपयांत खरेदी केला होता.