scorecardresearch

पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा, भाजपा आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?

गदारोळानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन

पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा झाला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे.

विधानसभेतील व्हिडीओ आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. “त्यांना मला ढकललं, शर्ट फाडला,” असं ते सांगत आहेत.

यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. आम्ही बिरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असताना सत्ताधारी आमदारांनी आम्हाला मारहाण केल्याचं सांगत ते सभागृहातून बाहेर पडले.

निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या आमदारांमध्ये सुवेंद्रू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बर्मन यांचा समावेश आहे.

बिरभूममधील घटना काय आहे?

२२ मार्चला घरांना आग लावल्यानंतर ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. बोगतुई गावात अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब टाकत १० घरांना आग लावली होती. स्थानिक पंचायतीमधील तृणमूल काँग्रेसच्या उपप्रमुखाची हत्या झाल्यानंतर ही घटना घडली होती. शुक्रवारी कोलकाता हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. याच घटनेवरुन पश्चिम बंगालमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोंधळ पहायला मिळाला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five bjp mlas were suspended after a scuffle broke out with tmc mlas in the west bengal assembly sgy

ताज्या बातम्या