भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे करून हत्या करण्याची धमकी देणारे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांच्याविरोधात विविध न्यायालयात पाच प्रलंबित खटले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मसूद यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, त्यांच्याविरोधात सहरानपूर येथील न्यायालयात चार खटले आणि लखनौ जिल्हा न्यायालयात एक खटला सुरू आहे. या खटल्यांमध्ये फसवणूक, धमकाविणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मसूद यांनी एका प्रचारसभेदरम्यान मोदींवर टीका करत, त्यांचे तुकडे-तुकडे करून हत्या करण्याचे वक्तव्य केले होते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
इम्रान मसूद यांच्याविरोधात पाच प्रलंबित खटले
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे करून हत्या करण्याची धमकी देणारे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांच्याविरोधात विविध न्यायालयात पाच प्रलंबित खटले आहेत.

First published on: 30-03-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five pending cases against congress imran masood