पीटीआय, गुवाहाटी

पाकिस्तानी एजंट्सना कथितरीत्या सिम कार्डाचा पुरवठा केल्याबद्दल पाच जणांना आसामच्या नागाव व मोरियागाव जिल्ह्यांतून अटक करण्यात आली आहे. या लोकांजवळून अनेक मोबाइल फोन, सिम कार्ड आणि एका परदेशी दूतावासाला संरक्षणविषयक माहिती पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅण्डसेटसह इतर आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.गुप्तचर विभाग व इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान या पाच जणांना अटक करण्यात आल्याचे आसाम पोलिसांचे प्रवक्ते प्रशांत भुयान यांनी सांगितले.

‘या दोन जिल्ह्यांतील सुमारे १० लोक निरनिराळय़ा सव्र्हिस प्रोव्हायडर्सकडून कपटाने सिम कार्डस मिळवत असून ते काही पाकिस्तानी एजंट्सना पुरवत आहेत व अशाप्रकारे देशाची एकता व सार्वभौमत्व यांच्या विरोधात काम करत आहेत, अशी माहिती मिळाली होती. तिच्या आधारे, आरोपींपैकी पाच जणांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली,’ अशी माहिती भुयान यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिकुल इस्लाम, बोदोर उद्दीन, मिजानुर रहमान व वाहिदुल झमान (सर्व नागांव) आणि बहरुल इस्लाम (मोरियागाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आणि इतर पाच आरोपींच्या घरांमधून हस्तगत करण्यात वस्तूंमध्ये १८ मोबाइल फोन, १३६ सिम कार्डस, एक फिंगरिपट्र स्कॅनर, एक उच्च तंत्रज्ञानयुक्त सीपीयू, तसेच जन्म प्रमाणपत्रे, पासबुक व छायाचित्रे यांसारखी काही कागदपत्रे यांचा समावेश आहे.
आशिकुल इस्लाम हा दोन आयएमईआय क्रमांक असलेला मोबाइल हॅण्डसेट वापरून त्यावरून व्हॉट्सअॅप कॉल करत होता व त्याद्वारे परदेशी दूतावासाला संरक्षणविषयक माहिती पुरवत होता, असे तपासात आढळले आहे.