गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राष्ट्रपतीपदाची अखेर आज निवडणू्क पार पडली. या निवडणूकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद हे उमेदवार आहेत, तर संयुक्त पुरोगामी आघाडीसह विरोधीपक्षांकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आता या निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी उत्तर प्रदेशातील भाजप समर्थकांनी होम हवनचे आयोजन केले होते. याची आज दिवसभर चर्चा सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाराणसीतील भाजप समर्थकांनी या हवनचे आयोजन केले होते. याबाबत वृत्त देताना एएनआयने काही छायाचित्रे ट्टिट केली आहेत. यामध्ये हवन करणारे भाजप समर्थक हे राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या कोविंद यांचे छायाचित्र घेऊन हवनसमोर बसले आहेत. त्यांच्यामागे भारताचा राष्ट्रध्वजही दिसतो आहे. यावेळी त्यांनी रामनाथ यांच्या विजयासाठी आणि राष्ट्रपतीपदी विराजमान व्हावे यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी देखील यापूर्वी भाजप समर्थकांनी अशा प्रकारे देशातील विविध भागात होम हवनचे आयोजन केले होते.

भाजप, भाजपचे मित्रपक्ष यांच्यासह केंद्र सरकारमध्ये सहभागी नसलेले अनेक पक्ष यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात सध्याच्या घडीला जवळपास दोन तृतीयांश मते आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती नेमकी भाजपच्या उलट पाहायला मिळते आहे. उमेदवार निवडीपासूनच काँग्रेस पक्ष गोंधळलेला पाहायला मिळाला. भाजपने दलित कार्ड खेळल्यावर काँग्रेसची फरफट झाली. भाजपमुळेच काँग्रेसलादेखील मीरा कुमार यांच्या रुपात दलित उमेदवार द्यावा लागला. मात्र उमेदवार निवडीला उशीर झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ सोडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For victory of kovind bjp supporters did hom havan
First published on: 17-07-2017 at 18:07 IST