फोर्ब्सने सन २०२०ची १०० सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत. तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग १३व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग १३ वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे ८८.७ अब्ज डॉलर संपत्ती आहे. नुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

अंबानी यांच्यानंतर आहेत हे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती

  • मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आहेत. अदाणींची एकूण संपत्ती २५.२ अब्ज डॉलर आहे.
  • तिसरे स्थान एचसीएल टेक्नॉलॉजिजचे अध्यक्ष शीव नाडर यांनी पटकावले आहे. नाडर यांची संपत्ती २०.४ अब्ज डॉलर आहे.
  • तर चौथ्या क्रमांकावर डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी हे आहेत. ते १५.४ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
  • पाचव्या क्रमांकावर हिंदुदजा ब्रदर्सच्या नावाचा समावेश आहे. हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती १२.८ अब्ज डॉलर आहे.
  • सहाव्या क्रमांकावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती ११.५ अब्ज डॉलर इतकी आहे.
  • सातव्या स्थानी पालोनजी मिस्त्री हे आहेत, त्यांची संपत्ती ११.४ अब्ज डॉलर आहे.
  • कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक हे आठव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ११.३ अब्ज डॉलर आहे.
  • तर नववे स्थान गोदरेज कुटुंबाला मिळाले आहे. त्यांची संपत्ती ११ अब्ज डॉलर आहे.
  • तसेच दहाव्या क्रमांकावर स्टील उत्पादक कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती १०.३ अब्ज डॉलर आहे.

सर्वाधिक १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत केवळ तीन महिला

फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंत लोकांच्या यादीत केवळ तीनच महिलांचा समावेश आहे. यामध्ये ओपी जिंदाल समुहाच्या सावित्री जिंदाल या १९व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ६.६ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर बायोकॉनच्या किरण मुजूमदार शॉ या २७व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ४.६ अब्ज डॉलर आहे. तर युएसव्हीच्या लीना तिवारी या तीन अब्ज डॉलर संपत्तीसह ४७व्या स्थानी आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forbes india rich list 2020 mukesh ambani tops for 13th consecutive time aau
First published on: 08-10-2020 at 19:07 IST