फोर्ब्सने जगातील उत्कष्ट कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली असून यामध्ये गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एका भारतीय कंपनीला पहिल्या पाच उत्कृष्ट कंपन्यांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. ती ‘इन्फोसिस’ ही आयटी कंपनी असून जगातील उत्कृष्ट कंपन्यांच्या फोर्ब्सच्या यादीत या कंपनीने तिसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये पहिल्या स्थानी ‘व्हिसा’ ही बँकिंग क्षेत्रातील आणि दुसऱ्या स्थानी ‘फेरारी’ या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील टॉपची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनंतर नेटफ्लिक्स, पेपल, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ड डिस्ने, टोयोटा, मास्टर कार्ड आणि कॉस्ट्को या कंपन्या पहिल्या दहा उत्कृष्ट कंपन्यांमध्ये आहेत. तर टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस) या भारतीय आयटी कंपनीने गेल्या वर्षी ३५वे स्थान पटकावले होते. यंदा या कंपनीने २२व्या स्थानी झेप घेतली आहे.

जर्मन स्टॅटिस्टिक कंपनी स्टाटिस्टासोबत फोर्ब्सने जगातील २००० मोठ्या कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप २५० उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या कंपन्यांची निवड करताना वापरण्यात आलेल्या निकषांमध्ये कंपनीची विश्वासार्हता, सामाजीक आचरण, कंपन्यांची उत्पादने आणि सेवांची क्षमता आणि मालक म्हणून कंपनीची निष्पक्षता या बाबींचा विचार करण्यात आला आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांमधून १५,००० कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये या यादीत पहिल्या २५० कंपन्यांमध्ये १२ भारतीय कंपन्यांचा समावेश होता.

यंदा २०१९च्या यादीत इन्फोसिस, टीसीएस या टॉपच्या कंपन्यांसह टाटा मोटर्स, टाटा स्टील, एल अँड टी या भारतीय कंपन्यांचा देखील फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. २०१८ च्या यादीत बऱ्याच भारतीय कंपन्यांचा समावेश होता. यंदाच्या यादीतही त्या कंपन्यांचा समावेश झाला असून त्यांचा क्रमांकही वधारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forbes list released infosys becomes the worlds third most regarded company aau
First published on: 24-09-2019 at 16:50 IST