भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या थांयलंड दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी बँकॉक याठिकाणी पार पडलेल्या एका कार्यक्रमात भारत-थायलंड संबंधाबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांनी एका भारतीय तरुणानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं आहे. जेव्हा मी परदेशात असतो, तेव्हा भारतीय राजकारणावर कोणतंही भाष्य करत नाही. त्यामुळे तुम्ही भारतात येऊन हा प्रश्न मला विचारा, याचं उत्तर द्यायला मला आनंद होईल, असं जयशंकर म्हणाले.

प्रश्न विचारणारा तरुण हा मूळचा तामिळनाडू राज्यातील असून तो थायलंडमध्ये राहतो. संबंधित कार्यक्रमात त्यानं तामिळनाडूच्या संदर्भाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी जयशंकर यांनी संबंधित प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं आहे.

हेही वाचा- “आम्ही सरकार चालवत नाही, कसंबसं सांभाळतोय” कर्नाटकच्या मंत्र्याचा फोनवरील संवाद व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी जेव्हा परदेश दौऱ्यावर असतो, तेव्हा भारतीय राजकारणाबाबत भाष्य करत नाही. तुम्ही भारतात येऊन हा प्रश्न विचारा, मला याचं उत्तर देण्यास खूप आनंद होईल,” असं जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी संबंधित कार्यक्रमात भारत-थायलंड संबंध, आत्मनिर्भर भारत, भारतातील व्यावसायिक सुलभता, भारतीय विद्यापीठे, रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं, अशा विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.