भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ नेते बलराज मधोक यांचे सोमवारी येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते (९६) वर्षांचे होते. संघटनेत तीव्र मतभेद निर्माण झाल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

गेल्या जवळपास महिनाभरापासून मधोक आजारी असल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

मधोक यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२० रोजी अविभाजित जम्मू-काश्मीरच्या स्कर्दू येथे झाला.

लोकसभा निवडणुकीत १९६७ मध्ये त्यांनी जनसंघाला ३५ जागा मिळवून दिल्या होत्या.

त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या उदयानंतर मधोक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची १९३७ मध्ये संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधोक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. जनसंघाच्या स्थापनेपूर्वी मधोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. तसेच ते अभाविपचे संस्थापकीय चिटणीस होते.