एपी, केप कॅनाव्हरल

‘स्पेसएक्स’च्या रॉकेटद्वारे चार देशांतील चार अंतराळवीर शनिवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. ते ‘स्पेसएक्स कॅप्सूलमधून रविवारी अंतराळ स्थानकात पोहचणे अपेक्षित आहे. मार्चपासून तेथे राहणाऱ्या चार अंतराळवीरांची ते जागा घेणार आहेत.

फ्लोरिडामधील ‘केनेडी स्पेस सेंटर’मधून अमेरिकेची अवकाश संस्था ‘नासा’च्या एका अंतराळवीरासह डेन्मार्क, जपान आणि रशियाचा अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका अवकाशयानाच्या प्रत्येक आसनावर वेगवेगळय़ा देशांचे अंतराळवीर असण्याची ही पहिलीच घटना आहे. या आधी नासा, स्पेसएक्स अवकाशयानात दोन किंवा तीन अंतराळवीरांना सहभागी करत होते.

नासाच्या अंतराळवीर जॅस्मीन मोघबेली यांनी कक्षेतून एक संदेश पाठवला असून त्यामध्ये त्यांनी आम्ही मोहिमेवर एकत्र असून आमचे एकसंघ पथक आहे, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नासाचे अवकाश मोहिमेचे प्रमुख केन बोवरसॉक्स यांनीही या मोहिमेबद्दल गौरोद्गार काढले आहेत. ते म्हणाले, किती सुंदर प्रक्षेपण आहे.. आणि चार आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांना एकत्र पाहणे रोमांचक आहे.