पीटीआय, स्टॉकहोम : फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.

अर्नो (८२) यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली. मात्र कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन सुरू केले. त्यांची २०पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत. लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आईवडिलांचा मृत्यू अशा घटनांचे चित्र त्यातून उभे राहते. त्यांच्या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वाधिक गाजलेल्या ‘द इयर्स’ या आत्मकथनपर लेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समधील समाजाची स्थित्यंतरे त्या विशद करतात. या पुस्तकाची खासियत अशी की यामध्ये प्रथमच त्यांनी नायिकेचा उल्लेख तृतीयपुरुषी केला. आतापर्यंतच्या कादंबऱ्यांमध्ये त्या ‘मी’ असे लिहीत असत. ‘द इयर्स’मध्ये त्यांनी ‘ती’ची कहाणी सांगितली. या आठवडय़ात नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून शुक्रवारी ‘शांतता पुरस्कार’ जाहीर होणार आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

लेखिकेविषयी..

पूर्वाश्रमीच्या अ‍ॅनी डचेन्स यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी फ्रान्समधील लिलिबोन इथे झाला. त्यांचे बालपण नर्ॉमडी येथील येटोट इथे गेले. शिक्षक होण्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी साहित्यामध्ये उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी विद्यापीठात साहित्यामध्ये अध्यापनाचे काम केले. ‘द इयर्स’ या पुस्तकासाठी २०१९ साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.

अ‍ॅनी अर्नो यांचे लेखन कोणत्याही तडजोडीशिवाय आणि थेट भाषेत आहेत. त्यांचे लेखन हे प्रशंसनीय आणि दीर्घकाळ टिकणारे असे आहे.

– अँड्रेस ओल्सन, अध्यक्ष, साहित्य नोबेल समिती