फळे व भाज्या शीतपेटीत म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्यावर फार विपरीत परिणाम होतो. तसेच त्यांना दिवसरात्रीचे चक्र अनुभवता आले तरच त्यांच्यातील पोषणमूल्ये वाढतात असे दिसून आले आहे. फळे व भाज्या सतत अंधारात किंवा सतत उजेडात ठेवण्याने त्यातील पोषकांचे प्रमाण कमी होते.
फळे व भाज्यांना दिवस व रात्रीचे चक्र हे जास्तीत जास्त पोषके व स्वाद निर्माण करण्यासाठी आवश्यक असते असे एका संशोधनात दिसून आले आहे. आपण जेव्हा फळे व भाज्या दुकानातून विकत आणतो तेव्हा त्या जिवंत असतात व दिवसातील कोणता काळ चालू आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते.
आपण फळे व भाज्या ज्या पद्धतीने साठवतो त्यावर त्यांच्यातील पोषणमूल्ये व आपले आरोग्य अवलंबून असते. जेव्हा आपण फळे किंवा भाज्या उजेडात म्हणजे बाहेर ठेवतो तेव्हा त्यांना दिवसरात्रीचे चक्र नैसर्गिक व आरोग्यदायी स्थितीत ठेवते, जर आपण फळे व भाज्या उजेड नसलेल्या कपाटात किंवा शीतपेटीत ठेवल्या तर त्यांना कायमचा अंधार किंवा उजेड अनुभवास येतो, त्यामुळे त्यांच्यातील पोषणमूल्ये कमी होतात.
भाज्या व फळे हंगामानंतरही प्रकाशीय संदेशांना प्रतिसाद देतात व त्यांच्या जैविक क्रिया बदलते, त्याचा परिणाम आरोग्य मूल्य व त्यांची कीटकांना तोंड देण्याची क्षमता यावरही होते असे अमेरिकेच्या राइस विद्यापीठातील जॅनेट ब्रॅम यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, की आपण भाज्यांची साठवणूक ही दिवस-रात्र यांच्या चक्रानुसार केली पाहिजे तसेच त्या केव्हा सेवन करणार आहोत याचा अंदाज घेतला पाहिजे. ब्रॅम व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात असे दिसून आले, की वनस्पतींमधील जैविक क्रिया या दिवस-रात्र चक्रानुसार बदलतात व शेतातून तोडल्यानंतरही फळे व भाज्यांचे हे चक्र सुरूच असते. प्राण्यांपेक्षा वनस्पतींची रचना वेगळी असते. त्यांची पाने, फांद्या, फळे यांना स्वतंत्रपणे जी स्वतंत्रपणे चयापचयाची व्यवस्था असते, तसेच हे सर्व घटक स्वतंत्रपणे काही काळ जगू शकतात.
फळे व भाज्या शेतातून तोडल्यानंतरही त्यांच्यातील जैविक घडय़ाळ चालू असते व आपण जर त्या भाज्या किंवा फळे फक्त उजेडात किंवा फक्त अंधारात ठेवल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो. पालक, झुशिनी, रताळे, गाजर, कोबी यांच्यात दिवस व रात्रीच्या चक्राचा जैविक परिणाम दिसून येतो. दिवसाच्या विशिष्ट काळातच फळे व भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे योग्य ठरू शकते, त्या वेळी त्यांच्यातील पोषके व
नक्की काय होते?
आपण फळे व भाज्या उजेड नसलेल्या कपाटात किंवा शीतपेटीत ठेवल्या तर त्यांना कायमचा अंधार किंवा उजेड अनुभवास येतो, त्यामुळे त्यांच्यातील पोषणमूल्ये कमी होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frozen fruits and vegetables lose nutrients
First published on: 22-06-2013 at 02:30 IST