देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १६ व्या दिवशी वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढणार असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
गेल्या काही दिवसांत देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते. सलग सोळाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलच्या दराने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलच्या दराने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला.
राज्यातील प्रमुख शहरांमधील दर ( हे दर प्रतिलिटर नुसार असून प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर दरात किरकोळ तफावत येऊ शकते):
पुणे
पेट्रोल – ८६. ०३ रुपये
डिझेल – ७२. ४७ रुपये
नागपूर
पेट्रोल – ८६. ७२ रुपये
डिझेल – ७४. ३२ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ८७. २२ रुपये
डिझेल – ७४. ७८ रुपये
नाशिक
पेट्रोल – ८६. ५७ रुपये
डिझेल – ७२. ९९ रुपये
ठाणे
पेट्रोल – ८६. ३२ रुपये
डिझेल – ७३. ८७ रुपये
कोल्हापूर
पेट्रोल ८६. ३८ रुपये
डिझेल – ७२. ८३ रुपये