आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८२ रुपये ५२ पैसे तर डिझलने लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतके दर गाठले. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास केंद्रीय अर्थ खाते तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तुर्तास दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराण- अमेरिकेमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव, व्हेनेझुएलातील अंतर्गत समस्या आणि मागणीत झालेली वाढ या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत (सुमारे ५ हजार ३१४ रुपये) पोहोचले आहेत. काही तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. बुधवारी कच्चा तेलाच्या दराने नोव्हेंबर २०१४ नंतरचा उच्चांक गाठला आहे. याचे पडसाद भारतात उमटले आहेत. दिल्ली, मुंबईत पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला.

मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर लिटरमागे ८२ रुपये ५२ पैशे तर डिझेलचे दर लिटरमागे ७० रुपये २४ पैशांवर पोहोचले. मुंबईत १४ सप्टेंबर २०१३ रोजी पेट्रोलच्या दराने लिटरमागे ८३ रुपये ६२ पैसे इतका पल्ला गाठला होता. जवळपास पाच वर्षांनी पेट्रोल व डिझेलच्या दराने पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात पेट्रोल ९ रुपये प्रति लिटरने व डिझेल ३.५० रुपये प्रति लिटरने स्वस्त  आहे.  त्यामुळे राज्य सरकारने हा अधिभार कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel prices hit new high mumbai petrol and diesel prices scaled new peaks
First published on: 25-04-2018 at 15:11 IST