देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनांच्या साह्य़ाने जीसॅट-६ हा आधुनिक दूरसंचार उपग्रह अवकाशात सोडण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) गुरुवारी यश आले. जीसॅट मालिकेतील हा १२वा उपग्रह आहे. लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचा हा उपग्रह नऊ वर्षे कार्यरत राहाणार आहे.
क्रायोजेनिक इंजिनाच्या साह्य़ाने उपग्रह अवकाशात सोडण्याची भारताची ही दुसरी वेळ असून यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी जीसॅट-५ हा उपग्रह इस्रोने अवकाशात सोडला होता. क्रायोजेनिक इंजिनांच्या साह्य़ाने उपग्रह अवकाशात सोडण्यात केवळ अमेरिका, रशिया,जपान, चीन व फ्रान्स या देशांच्या अवकाश संस्थांनाच यश आले होते. आता इस्रो या पंक्तीत स्थानापन्न झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले आहे.
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही-डी ६ या वाहक क्षेपणयानाच्या साह्य़ाने गुरुवारी दुपारी चार वाजून ५२ मिनिटांनी इस्रोने दोन हजार ११७ किलो वजनाचा जीसॅट-६ अवकाशात सोडला. अवघ्या १७ मिनिटांनी जीसॅट-६ जीएसएलव्ही-डी ६ पासून वेगळा होऊन पृथ्वीच्या वातावरण कक्षेत स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-अमेरिका अंतराळ ऐक्य!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था (नासा) यांनी अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करणारा ‘निसार’ हा उपगृह सोडण्यासाठी २०२१चे उद्दिष्ट राखले आहे. या उपग्रहामुळे पृथ्वी आणि तिच्या वातावरण बदलांचे संशोधन करता येणार आहे. त्याचबरोबर भारतीय पठारे, हिमालय, बर्फाळ प्रदेश तसेच सागरी किनारपट्टीचा प्रदेश यांचे संशोधन साधणार आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वआकलनासाठीही हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे.
२०१४ मध्ये आम्ही केलेली कामगिरी ही निव्वळ योगायोगाची नव्हती, हे आजच्या यशातून सिद्ध झाले आहे. क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येकाचे तसेच इस्रोच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे हे यश आहे.
– ए. एस. किरणकुमार,
इस्रोचे अध्यक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G sat launch success
First published on: 28-08-2015 at 05:44 IST