Manipur Women’s Violence Update : मणिपूरमधील दोन महिलांना जमावाने नग्न करत धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी (२० जुलै) आता या दोन पीडितेपैकी एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली कैफियत सांगितली आहे. यात तिने पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वयवर्षे २० आणि ४० असलेल्या या दोन पीडित महिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काही लोक या महिलांना नग्न करत धिंड काढताना रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर जमावातील लोकांनी या महिलांच्या शरीराला ओरबाडत शारीरिक अत्याचारही केले.

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणाचा…”

नेमकं काय घडलं?

१८ मे रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात जबाब देताना एका पीडितेने २० वर्षाच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचंही म्हटलं आहे. पीडित महिलेने सांगितलं की, जमावाने त्यांच्या गावावर हल्ला केल्यानंतर आसरा घेण्यासाठी त्या जंगलाकडे पळाल्या. यानंतर थौबाल पोलिसांनी या महिलांची सुटका केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र, पोलीस स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर असतानाच जमावाने त्यांना थांबवलं.

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० वर्षीय पीडित महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता तेव्हा पोलीसही हजर होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून सोबत घेतलं. काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी महिलांना रस्त्यावर जमावाबरोबर सोडून दिलं. त्यांना पोलिसांनीच जमावाच्या हवाली केलं. इतकंच नाही, तर जमावाने पीडित महिलेचे वडील आणि भाऊ यांची कथितपणे हत्या केली.