अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची मंगळवारी भेट घेतली. ग्लोबल इनव्हेस्टमेंट समीटच्यानिमित्ताने अदानींनी जॉनसन यांची भेट घेतली. सौरऊर्जा आणि इतर माध्यमातून ऊर्जा निर्मितीसाठी अदानी समूह ७० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल असा शब्द अदानी यांनी या भेटीदरम्यान दिल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉन्सन यांची भेट झाल्यानंतर अदानी यांनी फेसबुकवरुन जॉन्सन यांचे आभार मानलेत. “ग्लोबल इनव्हेसमेंट समीटमध्ये युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेटण्याची संधी मिळाली,” असं अदानी या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर करत म्हणाले आहेत. जागतिक वातावरण बदलासंदर्भातील निर्णयासंर्भात जॉन्सन हे प्रेरणादायी नेतृत्व असल्याचा उल्लेख करत अदानी यांनी अदानी समूह ऊर्जा क्षेत्रामध्ये ७० बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलंय.

“ग्लोबल इनव्हेसमेंट समीटमध्ये युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भेटण्याची संधी मिळाली. हा उत्तम मंच आहे. जागतिक हवामान बदलाचा विचार करुन निर्णय घेणारं हे प्रेरणादायी नेतृत्व आहे. अदानी समूह ७० बिलियन अमेरिक डॉलर्सची गुंतवणूक सौरऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजनच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये करणार आहे. मला ही भेटीची संधी दिल्याबद्दल युके सरकार आणि युके सरकारमधील उद्योग खात्याचे आभार,” असं अदानींनी म्हटलं आहे.

“अध्यक्ष गौतम अदानी यांनी वातावरण बदलांसंदर्भातील प्रश्नांना सुनियोजित आणि पूर्ण तयारीसहीत राबवण्यात आलेल्या धोरणांच्या मदतीने सोडलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. वातावरण बदलांसंदर्भातील ध्येय गाठण्यासाठी आपण साध्य करता येईल अशी लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन काम केलं पाहिजे असं त्यांनी लंडनमध्ये आयोजित युके ट्रेड समीटमध्ये म्हटलं आहे,” असं ट्विट अदानी समुहाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam adani meets boris johnson assures to commit 70 billion usd for clean energy scsg
First published on: 20-10-2021 at 09:42 IST