गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असून पंतप्रधान मोदी हे अदानींच्या फायद्याचे निर्णय घेतात, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. दरम्यान, या आरोपावर आता स्वत: गौतम अदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अदानी समूहाचे उद्योग देशातील २२ राज्यात असून सर्व ठिकाणी भाजपाचे सरकार नाही, असं ते म्हणाले. इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

काय म्हणाले गौतम अदानी?

“विरोधकांचे आरोप निराधार आहेत. आम्हाला देशातील प्रत्येक राज्यात गुंतवणूक करायची आहे. आज अदानी समूहाने २२ राज्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यापैकी अनेक राज्यं भाजपाशासित नाहीत. डाव्यांचा गढ मानल्या जाणाऱ्या केरळ तसेच पश्चिम बंगाल, ओडीस इथेही आमचे उद्योग आहेत. महत्त्वाचे म्हणजे आम्हाला यापैकी कोणत्याही राज्यात उद्योग करताना समस्या जाणवल्या नाहीत”, अशी प्रतिक्रिया गौतम अदानी यांनी दिली. तसेच “पंतप्रधान मोदींकडून तुम्हाला कधीही वैयक्तिक फायदा मिळू शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी विविध धोरणांविषयी चर्चा करू शकता. मात्र, जेव्हा एखादे धोरण तयार केले जाते, तेव्हा ते सर्वांसाठी असते. केवळ अदानी समूहासाठीच नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – अग्रलेख : चिखल चिकटण्याआधी..

पुढे बोलताना त्यांनी अदानी समूहाबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याचीही प्रतिक्रिया दिली. “मागील काही दिवसांत विरोधकांकडून आरोप करण्यात आला आहे की, आम्ही बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षात आमचे उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढलं आहे आणि कर्ज ११ टक्क्यांनी वाढलं आहे. आमची एकूण संपत्ती कर्जाच्या चौपट आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अदाणींच्या आर्थिक संकटाचा भार SBI वर पडणार? हजारो कोटींचं दिलंय कर्ज! बँकेचे अध्यक्ष म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधींच्या आरोपांकडे मी राजकीय विधानांच्यापलिकडे बघत नाही. गुतंवणूक ही आमच्यासाठी नियमित प्रक्रिया आहे. काही दिवसांपूर्वीच मी राजस्थानमधील गुंतवणूक परिषदेत सहभागी झालो होते. राजस्थानमध्ये आम्ही ६८ हजार कोटींची गुंतवणूक केली. यावेळी राहुल गांधींनी आमचं कौतुकही केलं”, अशी माहितीही त्यांनी दिली.