भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

या सर्व मुलांच्या शहीद वडिलांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, यासाठी आपण त्याने कायम ऋणी राहणार आहोत हे दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत गंभीरने या नवीन उपक्रमाबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने सोमवारी वयाच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.