एखाद्या ठिकाणाच्या, संस्थेच्या किंवा रस्त्याच्या नावावरून वाद झाल्याची अनेक प्रकरण गेल्या काही वर्षांत समोर आली आहे. अशा प्रकरणात प्रादेशिक किंवा धार्मिक अस्मिता देखील बऱ्याचदा महत्त्वाची भूमिका बजावत असते. मात्र, बिहारमधल्या गया विमानतळाच्या कोडवरून सध्या बरीच चर्चा सुरू झाली आहे. या कोडमधून आक्षेपार्ह अर्थ निघत असून तो तातडीने बदलण्यात यावा, अशी मागणी दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केली नसून चक्क आपल्या संसदीय समितीनं केली आहे. मात्र, IATA अर्थात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं भारताची ही मागणी फेटाळून लावली आहे.

शुक्रवारी संसदीय समितीने संसदेत गया विमानतळासाठी वापरण्यात येत असलेल्या युनिव्हर्सल कोडला आक्षेप घेतला. जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा या समितीने GAY या कोडला आक्षेप घेतला होता. तसेच, हा कोड बदलून YAG असा करण्यात यावा, असा पर्याय देखील समितीने दिला होता. त्यावर शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तर दिलं.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

हवाई सुरक्षेला धोका असला तरच…

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, IATA नं यासंदर्भातील विनंती फेटाळून लावली असून कोड बदलण्यास असमर्थ असल्याचं कळवलं आहे. IATA नं दिलेल्या उत्तरानुसार, यासंदर्भातील नियमाच्या कलम ७६३ नुसार, कोणत्याही ठिकाणाचा कोड हा एकदा दिल्यास कायमस्वरूपी असतो. तो बदलायचा असल्यास हवाई सुरक्षेला असलेला धोक्यासंदर्भात प्रबळ मुद्दे सादर करावे लागतात. गया विमानतळ सुरू झाल्यापासून हा कोड अस्तित्वात आहे. त्यामुळे हा कोड बदलणं कठीण आहे.

मंत्रालयाच्या उत्तरासंदर्भात संसदीय समितीने शुक्रवारी नवा अहवाल सादर केला आहे. यामध्ये “IATA चे सदस्य म्हणून एअर इंडियानं या मुद्द्यावर पुढाकार घेतला त्यासाठी समिती त्यांची आभारी आहे. मात्र, तरीदेखील आमची सरकारला विनंती आहे की सरकारने यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत”, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

GAY कोडला आक्षेप का?

समितीने आपल्या अहवालात नमूद केल्यानुसार, गया हे एक पवित्र शहर आहे. अशा ठिकाणासाठी प्रणालीमध्ये असणारा GAY हा कोड आक्षेपार्ह असून तो या शहरासाठी अयोग्य, अपमानजनक आहे. त्यामुळे तो तातडीने बदलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.