रोहतास जिल्ह्यातील बुधबा गावामध्ये एका १९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. गळा दाबून या मुलीचा खून करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. तिचा मृतदेह तिच्याच घरामागे टाकण्यात आला होता. याप्रकरणी पोलीसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुलीच्या काकांना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी घटनास्थळाजवळून एक मोबाईल संच जप्त केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सात जणांविरुद्ध संशय़ व्यक्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचा मृतदेह सासाराम सदर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl raped and murdered in bihar
First published on: 07-11-2013 at 03:49 IST