Girl Bleeds To Death After Sex अल्पवयीन मुलीच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. या मुलाने तिला मित्राच्या खोलीवर बोलवलं होतं. त्या खोलीत दोघांनी सहमतीने शरीरसंबंध ठेवले. मात्र त्यानंतर मुलीला रक्तस्त्राव होऊ लागला. तिची प्रकृती बिघडली ज्यानंतर या तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना पाटण्यातली आहे. तर मुलगी जहानाबाद येथील आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या कथित बॉयफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
मृत मुलीची भेट १० दिवसांपूर्वी एका मुलाशी झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. या मुलाने सदर अल्पवयीन मुलीला पाटणा या ठिकाणी मित्राच्या खोलीवर बोलवलं. मुलगी त्याच्या मित्राच्या खोलीवर आली, त्यावेळी दोघांमध्ये शरीरसंबंध आले. ज्यानंतर मुलीला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला आणि तिची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या कथित बॉयफ्रेंडला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी आता पोलीस करत आहेत. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. शनिवारी या घटनेची माहिती मिळाली ज्यानंतर आम्ही मुलीच्या कथित बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मुलीच्या आजोबांनी नेमकं काय सांगितलं?
मुलीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची नात (मृत मुलगी) पाचवीपर्यंतच शिकलेली होती. त्यानंतर ती शाळेत गेलीच नाही. तिचे वडील मजुरी करतात. माझ्या नातीने जाताना हे सांगितलं होतं की जहानाबादला चालली आहे. ती पाटणा या ठिकाणी कशी पोहचली त्याबद्दल कल्पना नाही असं तिच्या आजोबांनी सांगितलं आहे. जक्कनपूरचे पोलीस अधिकारी मनिष कुमार यांनी सांगितलं आम्ही दोन जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. त्यांचे विस्तृत जबाब आल्यानंतर गुन्हा नोंद केला जाईल.