देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. जगभरात या महामारीनं रौद्र रुप धारण केलं आहे. प्रत्येक देशातील वैज्ञानिक या महामारीवर लस शोधत आहेत. मात्र, अद्याप यावर कोणताही उपचार मिळाला नाही. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास कठोर कारवाईचे आदेश देम्यात आले आहे. अशीच कठोर कारवाई केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस सध्या चर्चेचा विषय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक वेगळाच प्रकार घडला. कानपूर पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे चक्क बकरीला अटक केली आहे. यामुळे देशभरात उत्तर प्रदेश पोलिस चर्चेचा विषय आहे. कानपूरमधील बेकनगंज परिसरातील पोलिसांनी बकऱ्याला अकट करण्याचा प्रताप केला आहे. बेकनगंज येथील पोलिस पेट्रोलिंग करत असताना अचानक रस्त्यात एक बकरी आढळली. मास्क न घालता फिरत असल्यामुळे पोलिसांनी या बकरीला जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

पोलीस बकऱ्याला जीपमध्ये घेऊन गेल्याचं समजताच मालकानं थेट पोलिस स्टेशन गाठलं. अनेक विनवण्या केल्यानंतर अखेर पोलिसांनी बकरीला मालकाच्या ताब्यात दिले. मात्र पुन्हा रस्त्यावर प्राणी फिरता कामा नये, अशी ताकीदही दिली.

हा सर्व प्रकार व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस लोकांमध्ये मस्करीचा आणि चर्चेचा विषय झाले. त्यावेळी खरा प्रकार समोर आला. IANS ला अनवारगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी शैफुद्दीन बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलिसांनी पेट्रोलिंगच्यावेळी एका तरुणाला पाहिलं जो मास्क न घालता बकरीला फिरवत होता. पोलिसांना पाहताच त्या तरुणानं बकरीला सोडून धूम ठोकली, त्यामुले पोलिसांनी जीपमधून बकरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goat arrested by kanpur police for not wearing mask in ups beconganj area nck
First published on: 27-07-2020 at 15:03 IST