माणसामधील सयामी जुळ्यांचा जन्म झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. इतर प्राण्यांमध्येही अशा काही दुर्मिळ घटना पहायला मिळतात. अशाच एका घटनेत एका शेळीने छोट्या शेळीला (करडू) जन्म दिला. मात्र, हे करडू सर्वसामान्य नाही. त्याला चक्क आठ पाय असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छत्तीसगढमधील बलरामपूर य़ेथे ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


प्राण्यांच्या बाळाचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जैविक बदल झाल्याने अशा अशा घटना घडतात. प्रामुख्याने प्राण्यांमध्ये हा प्रकार आढळतो. सयामी जुळ्यांमध्ये अनेकदा एका धडावर दोन डोकी किंवा कमरेखालील भाग एक अशा बाळांनी जन्म घेतलेल्या घटना अधून-मधून ऐकायला मिळतात.

इतर प्राण्यांमध्येही खूपच अपवादात्मक अशा घटना पहायला मिळतात. छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात घडलेल्या या घटनेने परिसरातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे शेळीचे करडू पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडाची प्रकृती चांगली आहे.

मात्र, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून दोष असल्याचे म्हटले आहे. अपवादात्मक स्थितीत गर्भधारणेच्या प्रक्रियेदरम्यान जैविक बदल घडून आल्याने असे प्रकार घडण्याची शक्यता असते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goat gives birth to 8 legged kid in chhattisgarhs balrampurs kervashila veterinary doctor calls it a birth defect
First published on: 16-09-2017 at 12:05 IST