Work From Office: गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल, सगळ्यांनीच वाचावा असा…

गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे.

Google-CEO-Sunder-Pichai
Work From Office: गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल (Photo-AP)

करोनामुळे संपूर्ण जगाचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. करोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. अशात गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. “कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरं वाटलं”, असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्याासाठी लस घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा कर्मचाऱ्यांना ईमेल

“मला आशा आहे की, प्रत्येक जण काळजी घेत आहे. करोना साथ आल्यापासून आपण कर्मचाऱ्यांचं हित समोर ठेवलं आहे. कठीण काळात २०० नवे प्रोडक्ट लाँच करताना आपण ग्राहक आणि भागिदारांची काळजी घेण्यासही पुढाकार घेतला आहे. मार्च २०२० मध्ये करोनाची साथ पाहता आपण कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं. तसेच करोनाचा धोका पाहता आपण हा अवधी वाढवला देखील आहे. कार्यलयं बंद असताना देखील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. या व्यतिरिक्त गुगलर्सच्या उदारतेमुळे आणि गुगल डॉट ओरजीकडून मिळालेल्या समर्थनामुळे आपण जगभरातील कमी उत्पन्न असलेल्या देशातील १ मिलियन लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. असं असलं तरी जगातील अनेक भागात करोनाचा फैलाव होत आहे. ज्या भागात करोनाच्या लसी उपलब्ध आहेत आणि लसीकरण वेगाने होत आहे. अशा ठिकाणांची कार्यलयं उघडणं सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळे गुगलर्सना पुन्हा एकदा कॅफेमध्ये जेवणाचा आनंद आणि विचारमंथन करताना पाहून आनंद वाटत आहे. लसीकरणामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होणार आहे.” असा संदेश गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मेलद्वारे दिला आहे.

२१ वर्षांच्या वैवाहिक कलहाचा सुप्रीम कोर्टात गोड शेवट

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या दोन सूचना

  • ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिस करायचं आहे त्यांनी करोनाच्या दोन्ही लस घेणं आवश्यक आहे.
  • करोनाचा धोका पाहता वर्क फ्रॉम होम पॉलिसी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google announced fully vaccinated employee allowed to come back on its campuses rmt