लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान २०२१ साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत. देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होते. दरम्यान केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

कोण आहेत अनिल चौहान?

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जनम १८ मे १९६१ रोजी झाला. त्यांच्याकडे १९८१ लाव ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यांनी मेजर जनरल पदावर अताना बारामुला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. पुढे लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात नेतृत्व केले. त्यांच्याकडे ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निवृत्त होईपर्यंत म्हणजेच मे २०२१ पर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी होती.

अनिल चौहान (निवृत्त) यांना लष्करातील परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

बिपिन रावत पहिले सीडीएस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण दल प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले होते. त्याच दिवशी त्यांनी संरक्षण दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. संरक्षण दल प्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.