रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.

या प्रस्तावाला अर्थखाते, गृहखाते तसेच मध्यवर्ती बँकेने जुलैमध्ये मान्यता दिल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. एक वर्षापूर्वी सदर प्रस्ताव सरकारपुढे विचारासाठी ठेवण्यात आला होता. मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.

या उत्पन्नातून कर्जाचा बोजा कमी करणं व समूहाची मुख्य कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये हिस्सा वाढवणं हा अंबानींचा उद्देश राहिला आहे. या व्यवहारानंतर जिओ ही या नवीन कंपनीची ३० वर्षांसाठी टेनंट राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt clears rs 25215 crore reliance jio brookfield tower deal
First published on: 04-09-2020 at 14:15 IST