आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर प्रथमच भाष्य केलं आहे. ग्रेटानं ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी रविवारी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत,”, असं ग्रेटानं ट्विट करून म्हटलं आहे.

दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत  व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greta thunberg reacts to disha ravis arrest says right to peaceful protest non negotiable bmh
First published on: 20-02-2021 at 08:55 IST