करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतातील आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. जीएसटी संकलनाची मार्च महिन्याची आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थ मंत्रालयाने आज (शुक्रवार) जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी १.४२ लाख कोटी रुपये झाले आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी जानेवारीमध्ये जीएसटी संकलन सर्वाधिक १,४०,९८६ कोटी रुपये होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर आपण वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, मार्च २०२२ मध्ये एकत्रित GST महसूल १,४२,०९५ कोटी रुपये आहे. यामध्ये CGST रु. २५,८३० कोटी, SGST रु. ३२,३७८ कोटी, IGST रु. ७४,४७० कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या रु. ३९,१३१ कोटींसह) आणि उपकर रु. ९,४१७ कोटी (माल आयातीवर गोळा केलेल्या रु. ९८१ कोटींसह) यांचा समावेश आहे. मार्चमधील महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे.

युक्रेन-रशिया संकट असूनही, जीएसटी संकलनात झालेली वाढ ही अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि औद्योगिक गती पुन्हा रुळावर येण्याचे लक्षण आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत जीएसटी संकलनावर परिणाम होऊ शकतो, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

More Stories onजीएसटीGST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collections hit record high of rs 1 42 lakh crore in march msr
First published on: 01-04-2022 at 18:46 IST