बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा तात्पुरत्या जामिनासाठीचा अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आसाराम बापू यांच्या वतीने भाच्याच्या अंत्यविधीसाठी त्यांना ३० दिवसांचा जामीन मिळावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांनी सांगितले, की भाच्याच्या अंत्यसंस्कारांसाठी तीस दिवसांचा जामीन मंजूर करता येणार नाही. आसाराम बापू यांच्या वतीने काल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तत्पूर्वी गांधीनगर न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता.
गांधीनगर न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळताना म्हटले होते, की त्यांचे पुतणे शंकर पगरानी (वय ६८) यांचे १९ मार्चला निधन झाले असले, तरी अंत्यसंस्कार कुटुंबातील इतर सदस्य करू शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2015 रोजी प्रकाशित
आसाराम बापूचा जामीनअर्ज फेटाळला
बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचा तात्पुरत्या जामिनासाठीचा अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
First published on: 28-03-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat court rejects 30 days bail request for asaram bapu