केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर आता 31 मार्च 2020 पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली आहे. पण, याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ‘आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करत येणार नाही’ असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या व्यक्तीने आपले आधारकार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तरी त्याला आयकर परतावा भरण्यापासून किंवा व्यवहार करण्यापासून रोखू शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आधार अ‍ॅक्टच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत सरकार कोणाचंही पॅन कार्ड अवैध ठरवू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला डिफॉल्टर घोषीत करु शकत नाही. असंही कोर्टाने स्पष्ट केलं. एका याचिकेच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने हा निर्णय दिला.

कसं करायचं लिंक –
१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे.

२. ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.

३. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.

४. ही माहिती भरुन झाल्यानंतर खाली कोड दिलेला असेल ज्याला Captcha Code असं म्हणतात. तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.

५. ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊ जाईल.

६. 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवून आधार-पॅन लिंक झाल्याची माहिती मिळवता येते. UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat hc says govt cant invalidate pan for lack of aadhaar linkage sas
First published on: 23-01-2020 at 13:14 IST