गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला २००६ मधील बेकायदेशीर खाणकामप्रकरणी पोरबंदर येथील न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात जवळपास ५४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
पोरबंदर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सी. व्ही. पंडय़ा यांनी गुजरातचे जलसंसाधनमंत्री बाबू बोखिरिया यांना बेकायदेशीर खाणकामप्रकरणी दोषी धरले आहे. बोखिरिया यांच्यासमवेत काँग्रेसचे माजी खासदार भरत ओदेदरा, कथित गँगस्टर भीमा दुला ओदेदरा आणि त्याचा मुलगा व पोरबंदर पणन समितीचा अध्यक्ष लक्ष्मण दुला ओदेदरा यांनाही तीन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
सौराष्ट्र केमिकल कंपनीला खाणकाम करण्याचे अधिकार असलेल्या खाणीतून सदर चौघांनी बेकायदेशीरपणे चुनखडीचे उत्खनन केले, असा आरोप करणारी तक्रार २००६ मध्ये सदर कंपनीचे व्यवस्थापक उमेश भावसार यांनी केली होती. सदर चौघांनी केलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे कंपनीला ५४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचेही तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर बोखिरिया देशाबाहेर पसार झाले त्यामुळे त्यांना फरारी घोषित करण्यात आले. तथापि, उच्च न्यायालयाने त्यानंतर बोखिरिया यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बोखिरिया यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोदवाडिया यांचा पराभव केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2013 रोजी प्रकाशित
खाणकाम घोटाळ्याप्रकरणी गुजरातच्या मंत्र्याला शिक्षा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला २००६ मधील बेकायदेशीर खाणकामप्रकरणी पोरबंदर येथील न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात जवळपास ५४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
First published on: 16-06-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat minister got prisonment in mining scam matter