भाऊ आणि बहिणीचं नातं हे आई आणि मुलाइतकंच पवित्र आणि अतूट असतं. अनेकदा भाऊ किंवा बहीण एकमेकांसाठी अशक्य गोष्टी करताना आपण पाहतो. अशीच एक बहीण बंगळुरूमध्ये आहे. बंगळुरूमधील गुरदीप कौर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. गुरदीप यांनी त्यांच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या लिव्हरचा म्हणजेच यकृताचा ६८ टक्के भाग दान केला आहे. आपल्या भावाचा जीव संकटात सापडलेला असताना गुरदीप यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या यकृताचा ६८ टक्के भाग दान दिला. याबद्दल गुरदीप म्हणाल्या की, आपण अवयव दान करणं गरजेचं आहे.

गुरदीप कौर यांना जेव्हा कळलं की, त्यांचा भाऊ आता लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय (यकृत प्रत्यारोपण) जगू शकणार नाही तेव्हा त्यांनी विवेक आणि धैर्याने परिस्थिती हाताळली आणि आपल्या भावाला नवं आयुष्य दिलं. पती आणि दोन मुलं असा परिवार असलेल्या गुरदीप यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपल्या भावाला यकृत दान केलं. आपल्या भावाचं आयुष्य वाचवणाऱ्या गुरदीपचं हे दान समाजासाठी प्रेरणादायक आहे.

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
How to use aloe vera gel for hair regrowth long hair home remedies
लांब, घनदाट केसांसाठी कोरफडबरोबर ‘या’ गोष्टी मिसळून केसांना लावा, झटपट होईल वाढ
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

दुबईत असताना भावाची तब्येत बिघडली

मे २०२१ मध्ये दुबईमध्ये गुरदीप यांचा भाऊ जसवंत सिंह यांना ताप आला होता तसेच त्यांचे डोळे पिवळे झाले होते. जसवंत सिंह यांना वाटलं की, आपल्याला कावीळ झाली आहे आणि ते डॉक्टरांकडे गेले. परंतु त्यांची तब्येत सुधारली नाही. त्यावेळी कोरोना या साथीच्या रोगाने जगभरात हाहाकार माजवला होता. अशा परिस्थितीत जसवंत सिंह यांच्या कुटुंबियांनी कसंबसं जसवंत सिंह यांना पंजाबला आणलं. परंतु त्यांची तब्येत अजूनच नाजूक होत गेली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, यकृत प्रत्यारोपणाचा एकमेव उपाय आपल्याकडे आहे. यकृत प्रत्यारोपण केल्यास जसवंत सिंह यांचा जीव वाचू शकतो.

हे ही वाचा Womens IPL : क्रिकेटच्या मैदानातही गौतम अदाणींची सरशी, मुकेश अंबानींच्या मुंबईपेक्षा महागडा संघ केला खरेदी

बंगळुरूत असलेल्या जसवंत सिंह यांच्या बहिणीला आपल्या भावाची परिस्थिती कळताच गुरदीप कौर पंजाबला रवाना झाल्या. त्यांना माहिती होतं की त्या त्यांचं यकृत देऊन आपल्या भावाला वाचवू शकतात. कारण गुरदीप यांना माहिती होतं की, त्यांची आई खूप वयस्कर आहे आणि जसवंत सिंह यांच्या मुलांचं यकृत त्यांच्यासाठी अनुरूप नाही. त्यामुळे ४३ वर्षीय गुरुदीप यांनी आपल्या भावाला यकृत देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >> शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा

पतीचाही पाठिंबा मिळाला

गृहिणी असलेल्या गुरदीप यांना दोन लहान मुलं आहेत. त्यापैकी एकाचं वय १६ तर दुसऱ्याचं वय ६ वर्ष इतकं आहे. त्यामुळे गुरुदीप द्विधा मनःस्थितीत होत्या. परंतु डोनरला (अवयव दान करणारा) कोणताही धोका नाही असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा गुरदीप आश्वस्त झाल्या आणि त्यांनी आपलं यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. गुरदीप यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, त्यांचे पती जे भारतीय सैन्यात सुभेदार मेजर आहेत ते सुरुवातीला कचरत होते. परंतु नंतर त्यांनाही वाटलं की, आपल्या बायकोने तिच्या भावाची मदत केली पाहिजे.