वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा वाद अजूनही संपलेला नाही. या प्रकरणाबाबत वाराणसी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीच्या केंद्रस्थानी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या मालकीसंदर्भात दिलेला एक निकाल आला आहे. या निकालाचा आधार घेत दोन्ही पक्ष आपली बाजू मांडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची गोळ्या घालून हत्या; गेल्या ४८ तासांत दोन हत्या!

पाच महिलांनी ज्ञानवापी मशिद परिसरात असलेल्या श्रृंगार गौरी देवीची पूजा करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितलेली आहे. त्यासाठीच्या याचिकेवरील आगामी सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. या महिलांनी आपल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या १९३७ च्या निकालाचा संदर्भ दिला आहे. १९३७ सालच्या खटल्यामध्ये साक्षीदारांनी सांगितल्यानुसार याआधी वादग्रस्त जागेवर हिंदू देवतांची पूजा केली जायची हे सिद्ध होते, असा दावा या महिलांनी आपल्या याचिकेत केला आहे.

हेही वाचा >>> मोदी सरकार बनावट गुन्ह्यात मनिष सिसोदियांना अटक करण्याच्या तयारीत; केजरीवालांचा गंभीर आरोप

तर दुसरीकडे मुस्लीम पक्षाची बाजू मांडणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मशीद या संस्थेने महिलांच्या दाव्याचा प्रतिवाद केला आहे. वक्फ बोर्डाची मालकी असलेल्या जागेवरच मशीद बांधण्यात आली आहे, असा निर्णय याआधीच कोर्टाने दिलेला आहे; असा दावा या संस्थेने केला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या खटल्यामधील दोन्ही पक्ष १९३७ सालच्या दीन मोहम्मद आणि उत्तर प्रदेश राज्य सचिव यांच्यातील खटल्याच्या निर्णयावर अवलंबून आहेत.

हेही वाचा >>> भाजपात प्रवेश करण्याआधीच हार्दिक पटेल यांनी कसली कंबर; पक्षविस्तारासाठी आखला ‘हा’ खास प्लॅन

दरम्यान, वाराणसी न्यायालयात सुरु असलेल्या विद्यामान खटल्याची आगामी सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. मात्र हा खटला सुरु असताना ज्ञानवापी मशीद प्रकरणात १९३७ साली देण्यात आलेल्या न्यायालयाचा निर्णय केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi mosque hearing litigants turn to 80 year old court ruling prd
First published on: 02-06-2022 at 14:53 IST