२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयानं दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयानं हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गानं पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणात हाफिज सईदला जुलै २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. हाफिजविरोधात आतापर्यंत चार प्रकरणातील आरोप निश्चित झाले होते. व्यावसायिक कर विभागानं जमात उद दावाच्या नेत्यांविरोधात एकूण ४१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २४ प्रकरणाचा निकाल लागला आहेत. तर इतर गुन्हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. सध्या हाफिज सईदला लाहोरमधील कोट लखपती तुरूंगात आहे.

लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयानं गुरूवारी हाफिज सईदसह जमात उद दावाच्या चार नेत्यांना इतर दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावली. हाफिजसह जफर इक्बाल आणि याहया मुजाहिद यांनाही प्रत्येकी साडेदहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयानं कुख्यात दहशतावादी हाफिज सईदच्या वर्तुळातील जमातच्या तीन नेत्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपूरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली होती.

हाफिज सईद लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. पाकिस्तानमध्येच हाफिज जमात उद दावा नावाची संघटनाही चालवतो. हाफिज सईद २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्येच दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये ११ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hafiz saeed 10 year imprisonment anti terrorism court bmh
First published on: 19-11-2020 at 16:49 IST