परराष्ट्र मंत्रालयांतर्गत काम करत असलेल्या हज कमिटीने हज यात्रेकरुंसाठी काही सुचना जाहीर केल्या आहेत. त्यात यात्रेकरुंना व्हायग्रा, अन्य लैंगिक उत्तेजना वाढवणारे औषध, पोर्न साहित्य, नशेचे सामान यासारख्या वस्तू सोबत बाळगू नयेत अशा सुचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुटखा, तंबाखू यासारख्या पदार्थांवरही बंदी घालण्यात आली आहे.
२२ सप्टेंबरपासून सुरु होणा-या हज यात्रेसाठी १६ ऑगस्टपासून टप्पाटप्प्यात प्रवाशांचे पथक हजच्या दिशेने रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणा-या हज कमिटी ऑफ इंडियाने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात व्हायग्रा, लैंगिक उत्तेजना वाढवणारे तेल व कॅप्सूल, पोर्न साहित्य, अमली पदार्थ हज यात्रेदरम्यान न बाळगण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. याशिवाय सौदी अरेबियात निर्बंध असलेल्या साहित्यांची एक यादीच हज कमिटीने जाहीर केली आहे. ‘हज यात्रे दरम्यान कोणतेही गैरकृत्य किंवा बंदी घातलेले साहित्य सोबत बाळगले तर तो गुन्हा आहे. या सर्व वस्तूंवर सऊदी अरबमध्ये बंदी आहे. त्यामुले हज यात्रेसाठीच्या अर्जासोबतच आम्ही सुचनांची महिती देणारे पत्रक जोडले आहे, असे भारतीय हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतऊर रहमान म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2015 रोजी प्रकाशित
हज यात्रेदरम्यान व्हायग्रा, पोर्न साहित्यावर बंदी
परराष्ट्र मंत्रालयांतर्गत काम करत असलेल्या हज कमिटीने हज यात्रेकरुंसाठी काही सुचना जाहीर केल्या आहेत.

First published on: 23-08-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haj pilgrims advised not to carry viagra porn material