हज यात्रेकरूंच्या विमान भाडय़ापोटी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विमान कंपन्यांकडे ५७ कोटी रूपये कमी भरण्यात आले आहेत, असे अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. हज समितीमार्फत यात्रेला जाण्यासाठी अनुदान बंद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले की, हज अनुदाने बंद करण्यात आली असली व सौदी अरेबियाने अनेक कर लादले असूनही भारतीय यात्रेकरूंना आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

हज प्रशिक्षण समन्वयकांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वर्षी सर्वाधिक म्हणजे १७५०२५ भारतीय मुस्लीम यात्रेकरू हजला जात आहेत. त्यातील ४७ टक्के महिला असून तोही विक्रमच आहे. गेल्या वर्षी विमान कंपन्यांना १२४८५२ यात्रेकरूंच्या विमान भाडय़ापोटी १०३० कोटी रूपये देण्यात आले होते. या वर्षी १२८७०२ यात्रेकरू असूनही ९७३ कोटीच रूपये द्यावे लागले. ५७ कोटी रूपये कमी भरावे लागले आहेत.

हज यात्रेकरूंसाठी विमानांचे वेळापत्रक

हज यात्रेला कुठल्या ठिकाणाहून विमानात बसायचे याची सुविधा मुस्लीम यात्रेकरूंना दिली असून १४ जुलैपासून हाजची विमाने दिल्ली, गया, गुवाहाटी, लखनौ व श्रीनगर येथून सुटतील. १७  जुलै -कोलकाता,  २० जुलै-  वाराणसी. २१ जुलै-मंगळुरू, २६ जुलै-गोवा, २९ जुलै औरंगाबाद, चेन्नई, मुंबई, नागपूर येथून हाज यात्रेसाठी विमाने सुटणार आहेत. ३० जुलैला रांची, १ ऑगस्टला अहमदाबाद, बंगळुरू, कोचिन, हैदराबाद,. जयपूर येथून, तर ३ ऑगस्टला भोपाळ येथून हजसाठी विमाने जातील.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haj yatra
First published on: 01-07-2018 at 01:23 IST